राजापूर तहसिल कार्यालयातील निवासी नायब तहसिलदार व महसूल नायब तहसिलदार या पदांचा कार्यभार मंगेश परांजपे यांच्याकडे सुपूर्द

राजापूर तहसिल कार्यालयातील महसूल विभागातील गेले अनेक वर्षे रिक्त असलेल्या नायब तहसिलदार पदांचा अतिरिक्त कार्यभार नकाताच सुपूर्द करण्यात आला आहे. निवासी नायब तहसिलदार व महसूल नायब तहसिलदार या पदांचा कार्यभार कोषागार अव्वल कारकून मंगेश परांजपे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. दिपा निटूरे यांच्याकडे पुरवठा निरिक्षण अधिकारी म्हणून, विवेक जाधव यांच्याकडे निवडणूक नायब तहसिलदार म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. गेली वर्ष दोन वर्षे महसूल व निवासी नायब तहसिलदार ही पदे रिक्त असल्याने अनेकांची प्रशासकीय कामे होताना विलंब लागत होता. आता या पदांचा कार्यभार मंगेश परांजपे यांच्याकडे दिल्याने लोकांची कामे वेळेत होण्यास मदत होणार आहे. सदर नियुक्त्यांबद्दल राजापूर तहसिल कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.

Comments