रत्नागिरी तालुक्यातील साखरतर गावातील नाईक हायस्कूलमध्ये दहावीच्या मुलांना निरोप

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी मार्फत चालवित असलेल्या शेख हसन उर्फ भाई शेठ दाऊद नाईक उर्दू हायस्कूल साखरतर मध्ये इयत्ता दहावीच्या मुलांचा निरोप समारंभ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साखरतर पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी निसार हसन राजपूरकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अलाउद्दीन साखरकर, इम्तियाज पटेल, महंमद राजवाडकर, अकिल साखरकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठनाने करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये पैगंबरवासी माजी उपाध्यक्ष सलाउद्दीन अब्दुल्ला मुल्ला व साखरतर गावातील दानशूर व्यक्ति मास्टर फकिर महंमद साखरकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुलांनी हम्द व स्वागत गीत सादर केले. पाहुण्यांची ओळख व स्वागत हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक परवेज गडकरी यांनी केले. मुख्याध्यापिका सौ. अंजुम सोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांना अभ्यासाचे महत्त्व तसेच अभ्यास कसा करावा याबाबत आपले मत प्रकट केले. विद्यार्थ्यापैकी महविश कलीम साखरकर हिने आपले विचार प्रकट केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये इम्तियाज पटेल, महंमद राजवाडकर तसेच शाहीद मजगांवकर यांनी आपले विचार मांडले. हायस्कूलच्या शिक्षिका राजमेहरा सोलकर यांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष निसार राजपूरकर यांनी मागील शैक्षणिक वर्षाचा आढावा घेत शाळेच्या चांगल्या निकालाबाबत आपले मत प्रकट करताना विद्यार्थ्याना अभ्यासाबाबत चांगले मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष अलिमिया काझी यांनी आपल्या मनोगतात दहावीच्या विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हायस्कूलचे जेष्ठ शिक्षक अझिम कोतवडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका सुगरा मजगांवकर हिने केले. या कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, सभासद पालक शिक्षक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठया संखेने उपस्थित होते.

Comments