पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी
*पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी - इंडियन प्रेस क्लबच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची कोल्हापुरात बैठक संपन्न*
👉 *महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार अस्लम सय्यद*
👉 *कोकण विभाग उपाध्यक्षपदी श्रीनाथ श्रीकृष्ण खेडेकर*
👉 *रत्नागिरी जिल्हा सचिवपदी सिद्धेश शिगवण तर खेड तालुका अध्यक्षपदी गोविंद राठोड यांची निवड जाहीर*
*कोल्हापूर - इंडियन प्रेस क्लब या पत्रकारांच्या नोंदणीकृत राष्ट्रीय संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक कोल्हापूर येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी पत्रकारांसाठी वेगळ्या महामंडळाची मागणी करण्याचा ठराव करण्यात आला. याच बैठकीत महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार अस्लमभाई सय्यद यांची, कोकण विभाग उपाध्यक्षपदी सा. गोळीबारचे संपादक श्री. श्रीनाथ खेडेकर यांची, रत्नागिरी जिल्हा सचिवपदी माझे कोकण या न्यूज चॅनेलचे सह संपादक श्री. सिद्धेश शिगवण यांची तर खेड तालुका अध्यक्षपदी दै.सकाळचे प्रतिनिधी श्री. गोविंद राठोड यांची निवड जाहीर करण्यात आली.*
*बुधवार दिनांक 9 मार्च रोजी कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पत्रकारांसाठी वेगळ्या महामंडळाची शासनाकडे मागणी करून पाठपुरावा करण्याचे ठरले. तसेच वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबवण्याचे ठरले. संघटनेच्या मुख्य कार्यालयाचे लवकरच शानदार उदघाट्न करून मुंबई, पुणे, सांगली आदी ठिकाणी विभागीय कार्यालयाचे उदघाट्न करण्याचे ठरवण्यात आले. याबरोबरच संघटनेच्या ध्येयधोरणानुसार पत्रकारांच्या हिताच्या दृष्टीने विविध ठराव करण्यात आले.*
*या बैठकीसाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विवेक पाटील, कार्याध्यक्ष श्री. हाजी अब्दुलभाई शेख, उपाध्यक्ष श्री. राजेंद्रकुमार शिंदे, महाचिटणीस श्री. विकास कुलकर्णी, खजिनदार श्री. जावेदभाई मुजावर, सदस्य श्री. सदाशिव खटावकर, सदस्या सौ. प्राजक्ता किणे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. शहाजहान आत्तार आदी कार्यकारिणी पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष श्री. विनोद नाझरे उपस्थित होते.*
*निवड झालेल्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.*
Comments
Post a Comment