२४ तासांत मुद्देमालासह पोलिसांनी सातजणांना अटक
चिपळूण:
चिपळूण बाजारपेठेतील सोने व्यावसायिकाचे अपहरण करून ३ किलो सोने व ९ लाखांची रोकड़ लुटणाऱ्या
पुण्यातील टोळीस अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. यामध्ये दोघेजण चिपळूण व खेडचे आहेत. या आरोपींपैकी काहींवर विविध राज्यांत १० प्रकारचे गुन्हे याआधीच
दाखल असून, त्यांना न्यायालयाने ६ दिवसांची कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी दिली. या घटनेची जिल्ह्यात एकच
खळबळ उडाली होती, मात्र, २४ तासात पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्याने पोलीसांचे अभिनंदन केले जात आहे.
Comments
Post a Comment