रत्नागिरी:दुचाकीची धडक;३ जण जखमी
रत्नागिरी:
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक कानलकोंड गवळीवाडी येथे दुचाकीस्वाराने वृद्धाला घडक दिल्याने अपघात घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे.अपघातात ३ जण जखमी झाले असून मोटरसायकलचे
नुकसान झाले आहे. दुचाकीस्वारावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमेश्वर
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार या अपघाताची फिर्याद महिला पोलीस हवालदार वर्षाराणी कोष्टी यांनी दिली आहे. सुनील पांडुरंग शिगवण (रा. मानसकोड) असे आरोपीचे नाव आहे.
अपघातामध्ये सुनील शिगवण, प्राजक्ता सुनील शिगवण व तानू रामा माटे हे जखमी झाले आहेत. सुनील शिगवण हे आपल्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एमएच ०८, एडब्ल्यू ९१५१ घेऊन कोसुंब ते वांद्री जात
होते. त्यांच्यासमवेत प्राजक्ता शिगवण देखील होत्या.
कानळकोंड गवळीवाडी येथे शिगवण यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तानु माटे यांना धडक बसली. हा अपघात मंगळवारी ७ वाजण्याच्या सुमारास घडला.
जखमींच्या दुखापतीस व दुचाकीच्या नुकसान
Comments
Post a Comment