रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये अँटी करप्शन ब्युरोची मोठी कारवाई

*अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी*

▶️ युनिट - *रत्नागिरी*

▶️ तक्रारदार - दत्तात्रय बाळू कदम, सहाय्यक पोलिस निरीक्षक, खेड पोलिस ठाणे

▶️ आरोपी -  निजाम हुसेन पटाईत, वय 50, वर्षे, रा गोवळकोट रोड, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी, ( खाजगी ईसम )
                                                                                                    
▶️ लाचेची देणे ठरलेली रक्कम - 5,000/-

▶️ लाच दिली - 3000/- रु

▶️ हस्तगत रक्कम - 3,000/- रु

▶️ लाचेची देणे ठरलेली दिनांक - 02/03/2022

▶️ लाच दिली दिनांक -02/03/2022

▶️ लाचेचे कारण -
यातील तक्रारदार हे खेड पोलिस ठाणे, अंतर्गत लोटे दुरखेत्र येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. यातील आरोपी हे लाकडाचे व्यावसायीक असून त्यांचा लाकूड वाहतूक करणारा ट्रक हा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी यांनी कारवाई करून लोटे पोलिस दुरक्षेत्र येथे लावलेला होता, त्यानंतर आरोपी यांनी त्याबाबत झालेला दंड भरलेला होता. पुढे सदर ट्रक मधील असलेल्या लाकडाबाबत वनविभाग यांना कारवाईच्या अनुशंगाने प्रस्ताव न पाठवता ट्रक आतील लाकडासह सोडून देण्यासाठी तक्रारदार यांना वारंवार लाच देण्याचे आमिष दाखवून वरील प्रमाणे लाच रक्कम देताना पकडल्याने गुन्हा दाखल करीत आहोत

▶️ सापळा  अधिकारी - 
*सुशांत चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक ला.प्र.वि., रत्नागिरी*

▶️ सापळा  पथक -
*स.फौ. संदीप ओगले, पो.हवा.विशाल नलावडे, पोना दीपक अंबेकर, पोशी अनिकेत मोहिते*

▶️ मार्गदर्शक अधिकारी -
*मा. श्री. पंजाबराव उगले सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे.*
*मा. श्री. अनिल घेरडीकर, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., ठाणे परिक्षेत्र, ठाणे.* 

=====================

▶️ रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्याला कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने एखाद्या खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी अथवा परवानगी मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

*चला भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न करू*

▶️ संपर्क-
पोलीस उप-अधीक्षक, सुशांत चव्हाण (9823233044),
पोलीस निरीक्षक, प्रवीण ताटे(8055034343) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी.

कार्यालय संपर्क क्र. - *02352-222893
टोल फ्री क्रं. - 1064
मेल-acbratnagiri@gmail.com

=====================

Comments