दापोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 30 मार्च रोजी होणार लोकार्पण

दापोलीच्या शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीच्या नगराध्यक्षा सौ.ममता मोरे यांनी शिवसेना नेते, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नुकतीच भेट घेऊन दापोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आपल्या हस्ते व्हावे अशी विनंती केली असता मंत्री आदित्य ठाकरे यांनी ३० मार्च ही तारीख दिली आहे. सदर भेटीवेळी खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची ही भेट घेतली. यावेळी राज्याचे परिवहन मंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री अनिल परब, माजी आमदार सुर्यकांत दळवी, दापोली विधानसभा लोकप्रिय माजी आमदार संजय कदम, विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, बबन मोरे, उपशहरप्रमुख विक्रांत गवळी, सौ भाग्यश्री चव्हाण, प्रसाद दरिपकर, अपी मोरे तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments