राज्यातील महाविकास आघाडी शासनाकडून राजापूर नगर परिषदेला सुमारे 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर: माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांची माहीती

राज्यातील महाविकास आघाडी शासनाकडून राजापूर नगर परिषदेला सुमारे 3 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून राजापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती सार्वजनिक कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष ॲड.जमीर खलिफे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कोरोना महामारीच्या कालावधीत माजी नगराध्यक्ष ॲड.खलिफे यांनी माजी आमदार सौ.हुस्नबानू खलिफे यांच्या माध्यमातून राजापूर नगरपरिषदेला निधी मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या प्रयत्नांना यश येताना महाविकास आघाडी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून अडीच कोटी तर रस्ते अनुदानातून 50 लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे. याबद्दल ॲड.खलिफे यांनी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, अर्थमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, माजी विधान परिषद आमदार खलिफे यांचे आभार व्यक्त केले आहेत. या निधीचा वापर राजापूर शहराचे सौंदर्य खुलविण्यासाठी करण्यात येणार असल्याचे ॲड.खलिफे यांनी सांगितले. 

आगामी काळात राजापूर शहरातील भिकाजीराव चव्हाण उद्यान, रानतळे येथील पिकनिक स्पॉट यांचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील अर्जुना नदीपात्रात असलेले पुंडलिकाचे मंदिर आणि त्या लगत असलेल्या ऐंशा मौला दर्गा सुशोभिकरणासाठी 25 लाख रूपये खर्च करण्यात येणार असून या ठिकाणी धार्मिक पर्यटनस्थळ तयार होणार आहे. तसेच शहरातील नन्हेसाहेब पुलाची दुरावस्था झाली असून या पुलावर विद्युतीकरण करून सुशोभीकरण करण्यात येणार असे अŸड.खलिफे यांनी सांगितले. 
राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर प्रवाशांसाठी तीन ठिकाणी प्रवासी निवारा शेड उभारण्यात येणार आहे.
अल्पसंख्यांक निधीतून 15 लाख रूपये मंजूर असून ते शहरातील कब्रस्तानसाठी वापरण्यात येणार आहेत. तसेच मुख्य रस्त्याच्या धोकादायक भागाचे रूंदीकरण, लाल बहाद्दूर शास्त्री रस्ता मजबुतीकरण, वरचीपेठ महापूरूष घुमटी ते कोंढेतड पुल रस्ता मजबुतीकरण, मराठा बोर्डींग येथे संरक्षक भिंत बांधणे, कोंढेतड येथील महंमदसो ठाकूर उद्यान सुशोभिकरण अशी कामेही करण्यात येणार आहेत. तसेच अर्जुना कोदवली नदीचे संगमस्थळही विकसित करण्यात येणार असल्याचे अŸड.खलिफे यांनी सांगितले.  
मागील निवडणूकीत काँग्रेस आघाडीने शहरवासीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यावर गेल्या पाच वर्षात भर देण्यात आला असून अद्यापही अनेक कामे पस्तावित आहेत. राजापूर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी आपण सर्वातोपरी प्रयत्न करणार असल्याचेही अŸड.खलिफे यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार सौ.हुस्नबानू, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, माजी नगरसेवक सुलतान ठाकुर, हनिफ युसूफ काझी, मुमताज काझी, परवीन बारगीर, स्नेहा कुवेसकर, नाना कुवेस्कर आदी उपस्थित होते.


टिप्पण्या