28, 29 व 30 मार्च च्या संपाच्या पार्श्वभूमीवर बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस रत्नागिरीमध्ये युनियनची मास मिटिंग संपन्न

दि. 24 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता बँक ऑफ इंडीया झोनल ऑफिस रत्नागिरीत "कॉन्फरन्स" मध्ये बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे या संघटनेची 28, 29 व 30 मार्च रोजी पुकारलेला संप का? व कश्यासाठी? यावर जाहीर सभा घेण्यात आली. भारतामधील बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य असणारी बँक कामगारांची "ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन" या संघटनेने भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या सरकारी बँका यांचे खाजगिकरण करण्याचे घोषित केल्याने, तसेच बँकिंग विधेयक बील मागील हिवाळी अधिवेशनात बँक कर्मचारी संघटनांचा प्रचंड विरोध झाल्याने हिवाळी अधिवेशनात मांडले गेले नाही. हे बँकिंग विधेयक बील येत्या चालू अधिवेशनात दि. 28 मार्च रोजी मांडण्याची शक्यता असल्याने देशातील 11कामगारांच्या संघटनांनी, कामगारांच्या विरोधातील येणारे बँकिंग विधेयक बीलाला विरोध करण्यासाठी  28 व 29 मार्च रोजी संपाचे आवाहन केले आहे. या संपाला देशातील विमाकर्मचारी, शेतकरी संघटनांनी, विद्युत कर्मचारी आणि इतर अनेक कामगार संघटनांनी पाठिंबा देत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
1) सार्वजनिक बँकांचे खाजगिकरण थांबवा.
2) सार्वजनिक बँका मजबूत करा.
3) मोठ्या थकीत कर्जदारांची कर्जे वसूल करा.
4) मुदत ठेवींवरील व्याज दरात वाढ करा.
5) ग्राहकांच्या बचतीवर वेगवेळ्या प्रकारचे सर्व्हिस चार्जेस लावू नका.
या प्रामुख्याने संघटनेच्या मागण्या आहेत.
या संपामुळे देशातील 10 कोटी कामगार संपात सहभागी होणार आहेत. बँकिंग क्षेत्रातील 5 लाख कामगार हे संपावर असणार आहेत.
30 मार्च चा संप हा बॅंक ऑफ इंडिया मध्ये एकाच बँकेत आहे. त्याच्या मागण्या प्रामुख्याने पुढील प्रमाणे...
1) बँक व्यवस्थापनाने करन्सी चेस्ट मधील कायमस्वरूपी व नियमित कामाचे कंत्राटदार मार्फत कंत्राटीकरण केले आहे. यामुळे पर्मनंट कामावर/जॉब वर घाला आहे. 
2) सर्व कामांचे कंत्राटीकरण बंद करा व भरती चालू करा.
3) क्लार्क, शिपाई, आर्मगार्ड यांची पुरेश्या प्रमाणात भरती करा.
4) रोजंदारीवर काम करणारे / डेलिवेजीस यांना कायमस्वरूपी कामावर घ्या.
5) सरकारच्या बँक खाजगिकरणाला धोरणाला विरोध
6) बँक व्यवस्थापनाच्या कामगार विरोधी धोरणाला/ त्यांच्या माईंड सेटला विरोध करण्यासाठी 30 मार्चचा संप बँक ऑफ इंडियात पुकारण्यात आलेला आहे.
           या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन करण्यासाठी 24 मार्चला मास मिटिंग आयोजन करण्यात आले. या मास मिटिंग मध्ये कॉ. उल्हास देसाई - अध्यक्ष, कॉ. शिरीष राणे - सेक्रेटरी, कॉ. विनोद कदम - ऑर्गनायझिंग सेक्रेटरी यांनी मार्गदर्शन केले. खासकरून या मिटींगला कॉ. दिलीप ठोंबरे - उपाध्यक्ष, कॉ. संजीव डोंगरे - खजिनदार व कॉ. मारुतराव निकम - असिस्टंट सेक्रेटरी यांची विशेष उपस्थिती लाभली. या मास मिटींगला लांजा, संगमेश्वर व रत्नागिरी ब्लॉक व रत्नागिरी सिटी मधील 25 शाखांमधील बंधू- भगिनीं उपस्थित होत्या. यामिटिंगचे संपूर्ण आयोजन नियोजन कॉ. विनोद कदम यांनी केले. आभार प्रदर्शन कॉ. मनोज लिंगायत यांनी केले. यानिमित्ताने मनोज लिंगायत सारखा उभारता/सळसळता कार्यकर्ता मिळाला.

Comments