रत्नागिरी: बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यु
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील संदीप चव्हाण यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला केल्याने ती मृत झाली.ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली. गणेशगुळे येथील संदीप चव्हाण यांची दहा पाळीव जनावरे नेहमीप्रमाणे चरण्यासाठी सोडण्यात आली होती. नेहमी ठरल्या वेळेत ती सर्व जनावरे परत येतात, परंतु शुक्रवारी सायंकाळी नऊ जनावरे घरी परतली. परंतु एक गाय परत आली नाही. त्यामुळे त्यासंदर्भात श्री. चव्हाण यांनी शोधाशोध सुरू केली.अखेर गणेशगुळे गावातील नवेदरवाडी परिसरात गया मृतावस्थेत सापडली.बिबट्याने तिच्यावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात
चिरफाड केली होती. पोलिस पाटील संतोष लाड यांनी या घटनेबाबत पोलिस व वन विभाग अधिकारी यांना तातडीने कळविले. श्री.चव्हाण यांची चार महिन्यापूर्वी बिबट्याने गाय मारली होती. सध्या बिबट्याचा वावर
सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पावस कुंभार घाटीपरिसरात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत होते. त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment