रत्नागिरी:उद्या "येथे" बैलगाडी शर्यतीचा थरार ;राज्यस्तरीय स्वरुप,६० गाड्या धावणार
देवरुख:
सन २००३ नंतर साडवली येथे शनिवारी १९ तारखेला राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धांचा थरार पहायला मिळणार आहे. ६० स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. बैलगाडी स्पर्धेची बंदी उठल्यानंतर हि स्पर्धा प्रथमच साडवली येथे होत असल्याची माहिती माजी राज्यमंञी रवींद्र माने यांनी दिली.
साडवली येथील मीनाताई ठाकरे विद्यालयाच्या जवळील मैदानावर हि स्पर्धा १९ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. राजेंद्र जाधव व प्रद्युम्न माने आणि संगमेश्वर तालुका बैलगाडी चालक मालक संघटना यांनी याचे आयोजन केले आहे. रवींद्र माने पुरस्कृत या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे २१हजार, १५ हजार, १० हजार व उत्तेजनार्थ अनुक्रमे ५ हजार,३ हजार,२ हजार अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. टायमिंग पद्घतीने एका वेळी एकच बैलगाडी धावणार आहे.
स्पर्धेवेळी खासदार विनायक राऊत, रवींद्र माने, सौ.नेहा माने, आमदार शेखर निकम, राजन साळवी, माजी आमदार सुभाष बने, सदानंद चव्हाण, ठेकेदार अण्णा सामंत, माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने, सचिन कदम, विलास चाळके, राजेंद्र महाडीक, उदय बने, प्रमोद पवार, सौ.वेदा फडके,सौ.निलम हेगशेट्ये आदि उपस्थित राहणार आहेत.
सर्जा राजाचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन राजेंद्र जाधव, प्रद्युम्न माने यांनी केले आहे. देवरुख, साडवली, ओझरे परिसरात बैलगाडी सरावही सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.
Comments
Post a Comment