रत्नागिरीतील शासकीय विभागीय ग्रंथालयाचे दुरुस्ती, आधुनिकीकरण, सुशोभिकरण कामाचे पालकमंत्री अनिल परब व मंत्री ना.उदय सामंत यांच्या उपस्थितीत भूमिपुजन
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या रत्नागिरीतील शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या दुरुस्ती, नुतनीकरण, सुशोभिकरण व आधुनिकीकरण कामाचा शुभारंभ रविवारी पालकमंत्री अनिल परब यांच्या हस्ते झाला. या कामासाठी चार कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कार्यक्रमावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना.उदय सामंत, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजाभाऊ लिमये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता विणा पुजारी, ग्रंथालयाचे डॉ. विजयकुमार जगताप आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment