रत्नागिरी:इनोव्हा-ट्रक चा अपघात

मुंबई-गोवा महामार्गावरील तळेकांटे येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या इनोव्हा कारने ट्रकला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
पद्यनाभम एकांबर पकाली (59) हा आपल्या ताब्यातील इनोव्हा कार घेऊ न मुंबईहून गोव्याच्या दिशेने चालला
होता. तळेकांटे येथे आला असता त्याने रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही गाडयांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
याबाबतची फिर्याद ट्रक चालक अभिलाष कुमार (28,रा. केरळ) याने संगमेश्वर पोलीस स्थानकात दिली.त्यानुसार इनोव्हा कार चालकावर भा. द. वि. कलम 279 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक चव्हण करत आहेत.

Comments