देवरूख येथे जल जीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न
दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मा.डॉ.इंदूराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी, मा.श्री.जयसिंग माने, सभापती, पं.स.संगमेश्वर यांच्या हस्ते अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, साडवली, देवरुख, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथे करण्यात आले. यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यानी जल जीवन मिशन मध्ये कौशल्य आधारीत कारागिराने प्रशिक्षणाचा लाभ घेवून आपल्या पाणी पुरवठा योजना अखंडीतपणे कार्यन्वीत रहण्यासाठी आपली सेवा उपलब्ध करुन द्यावी यासाठी सदरचे प्रशिक्षण महत्वाचे आहे असे आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यामानाने रत्नागिरी जिल्हयामध्ये गावोगावी जल जीवन मिशन हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावातील कुटुंबांना सन 2024 पर्यंत ‘हर घर नल से जल’ या प्रमाणे वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने सुचित केलेप्रमाणे 90 दिवसाच्या मोहिमेंतर्गत शासनाने ग्रामपंचायत, ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती यांना येाजनेच्या अंमलबजावणी व देखभाल दुरुस्ती टप्प्यावर गावातील प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशन (वायरमन), गवंडी इ. गावस्तरावरील विविध संवर्गातील कौशलय प्रदान करीत असलेल्या व्यक्तीना प्रशिक्षण देणेबाबत केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन मार्गदर्शक सुचनांमध्ये सूचित केलेले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जल जीवन मिशन अंतर्गत संगमेश्वर तालुक्यातील ग्रामस्तरावरील प्लंबर, फिटर, इलेक्ट्रीशन, पंप ऑपरेटर या संवर्गातील प्रशिक्षणार्थींना अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, साडवली, देवरुख, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी येथे दि.24 व 25 फेब्रुवारी 2022 या कालावधीत प्रशिक्षण देण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाला मा.प्रकल्प संचालक (पा.व स्व.) श्री.अमोल भोसले, कार्यकारी अभियंता (ग्रापापु) श्री.डी.एस.परवडी, पंचायत समिती संगमेश्वर चे गट विकास अधिकारी श्री.नरेंद्र रेवंडकर, कृषी अधिकारी श्री.विनोद शिंदे, विस्तार अधिकारी (पं.) श्री.शंकर घुले, मातृमंदिर देवरुख चे कार्याध्यक्ष श्री.अभिजीत हेगशेटये, अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, साडवली चे प्राचार्य श्री.समीर हेगशेटये, निदेशक व कर्मचारी, ग्रामस्तरावरील आलेले प्रशिक्षणार्थी हे उपस्थित होते.
Comments
Post a Comment