रत्नागिरी:दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील बेलबाग आणि येथे कासारवेली पारवाडी बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्बास मुकादम ऊर्फ देसाई (वय ४५, रा. हुर अपार्टमेंट अजमेरी नगर,रत्नागिरी) आणि अनिता अनंत वायंगणकर (७०, रा. कासारवेली, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी या कारवाईत अब्बासकडून ४७० रुपयांची ९ लिटर दारू, तर अनिताकडून २६५ रुपयांची
५ लिटर दारू जप्त करण्यात आली. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment