रत्नागिरी:आढळला महिलेचा मृतदेह

रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील नाखरे साळवीवाडी येथे महिलेचा मृतदेह आढळला. पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सौ. मनीषा मंगेश वारिशे (वय ३५, रा.
मावळंगे वरची गुळेकरवाडी, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी सहाच्या सुमारास साळवीवाडी रस्ता येथे निदर्शनास
आली. या प्रकरणी प्रदीप गणपत थुळ (वय ४३, रा.मावळंगे-थुळवाडी) यांनी पूर्णगड पोलिसात खबर दिली. थुळ हे मावळंगे येथून नाखेर येथील कामगारांना घेऊन जात असताना नाखरे साळवीवाडी बस स्टॉप येथे
उभ्या असलेल्या चारपाच महिलांनी थुळ यांना थांबवून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांची खात्री केली असता महिलेच्या पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत
झाल्याचे दिसून आले.

Comments