रत्नागिरी:लग्नाचे आमिष दाखविले....आणि मग केले डॉक्टर महिलेवर अत्याचार!

रत्नागिरीः-
महिला डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुख्य संशयिताची आई व बहिणीने आपल्याला शिविगाळ केल्याचे पिडित महिला डॉक्टरने तक्रारीत नमूद केले आहे.तक्रारीवरून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.डॉ. महेश बसंत खबरे (वय २९) तसेच त्याची आई सुप्रिया वसंत खबरे (वय ५१ , रा . दोन्ही बेळगाव कर्नाटक) व बहिण प्रियंका संदीप चौथे (वय ३१, रा. नांदेड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, रत्नागिरी शहरात तरूण महिला डॉक्टर वास्तव्य आहे. ही पिडित डॉक्टर महिला व संशयित डॉ. महेश खबरे यांच्यात मैत्रिचे संबंध होते. यातून महेश याने या पिडित डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखवून मार्च २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान पिडित डॉक्टर राहत असलेल्या घरी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान डॉ. महेश खबरे यांच्याजवळ पिडित डॉक्टरने लग्नासंबंधी विचारणा केली असता उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. तसेच लग्न करण्यास नकार देण्यात आला. तसेच याबाबत डॉ. महेश खबरे याची आई व बहिणीकडून पिडितेला शिविगाळ केली, अशी तक्रार पिडित महिला डॉक्टरने शहर पोलिसांत दाखल केली आहे.त्यानुसार पोलिसांनी संशयितांवर भादवि कलम ३७६ (२),(एन), ४२०, ५०४,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक भोसले याचा अधिक तपास करीत आहेत.

Comments