डी.जे.सामंत महाविद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त पुस्तक परीक्षण स्पर्धा उत्साहात पार....

रत्नागिरी तालुक्यातील पाली येथील डी जे सामंत महाविद्यालयाच्या मराठी वाड्मय मंडळ व ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस महाविद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पुस्तक परीक्षण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  त्याचे प्रमाणपत्र वितरण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  कांता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी व्यासपीठावर मराठी वाड्मय मंडळाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे, ग्रंथालय विभाग प्रमुख सौ. मंजिरी कुलकर्णी,  प्रा. अनिकेत जाधव, प्रा.  भूषण पाध्ये, प्रा.  सुदिप पवार व्यासपीठावर उपस्थित होते.
           मराठी भाषा दिनाचे प्रास्ताविक मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी  केले मराठी भाषेचे महत्व त्यांनी  विशद केले, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ.  कांता  कांबळे यांनी पुस्तक आपल्याला जगण्याची उर्मी देतात, त्यामुळे प्रत्येकांनी  पुस्तकाचे वाचन करण्याची आवश्यकता व्यक्त केली . या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ग्रंथालय विभाग प्रमुख सौ.  मंजिरी कुलकर्णी यांनी केले.  मराठी दिनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पुस्तक परीक्षण स्पर्धेचा  बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला.  या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - कु.  अंकिता मोहिते (प्रथम वर्ष वाणिज्य),   द्वितीय क्रमांक -  प्रभात कांबळे (तृतीय वर्ष कला),  तृतीय क्रमांक - विभागून लीना देवळेकर (तृतीय वर्ष कला), ओंकार काजरेकर( तृतीय वर्ष वाणिज्य),  उत्तेजनार्थ विभागून - गौरव कांबळे (तृतीय वर्ष कला),  अथर्व गार्डी  (द्वितीय वर्ष कला)  या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.  
          या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरेश भटांचे लाभले आम्हास भाग्य हे समूह गीत विद्यार्थ्यांनी  सादर केले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभात कांबळे व सिद्धी चव्हाण यांनी  केले.
          हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांचा मोलाचा सहभाग लावला.

Comments