६८ हजाराची घरफोडी, रोकड व सोन्याच्या दागिन्यावर डल्ला

खेड:
खेड शहरापासून जवळच असलेल्या खोंडे गावात अज्ञात चोरट्यानी बंद असलेल्या घराची खिडकी तोडून आत प्रवेश करून ६८ हजार रुपये किमतीचे रोकड रक्कमेसह सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना बुधवारी उघडकीस आली या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सिध्दी गणेश सकपाळ (४० रा. भडगांव-खोंडे, ता. खेड) यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. सकपाळ यांचे घर १६ रोजी बंद होते याचा फायदा उठवत चोरट्यानी घराच्या खिडकी वाटे प्रवेश करून घरातील ५५ हजार रुपये किंमतीचा सव्वा सोन्याचा हार, ६ हजार रूपये किंमतीची कानातील सोन्याच्या पट्ट्या, ७ हजार रुपयांची रोकड रक्कम असा ६८ हजार रुपयांचा मुद्दे माल तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, ब्राऊन रंगाची पर्स, दुचाकीचे आरसी बुक असा ऐवज अज्ञात चोरट्यांने चोरून नेला. या प्रकरणी भा. दं. वि. क. ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments