फुटब्रीज (साकव) मंजूर

*रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार लोकसभा शिवसेना गटनेते शिवसेना सचिव मा.श्री. विनायकजी राऊत यांनी रत्नागिरीतील अतिवृष्टीमध्ये वाहून गेलेले फुटब्रीज (साकव) मंजूर झाले नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थांना पावसाळ्यातील मार्ग बंद होणार आहे. सध्या नदीतून पाणी नसल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थ नदीतून जात आहेत. काही गावामध्ये अन्य मार्गावरून वळसा घालुन विद्यार्थी व ग्रामस्थांना जावे लागत आहे. यासंदर्भात खासदार श्री विनायकजी राऊत यांनी पालकमंत्री मा.ना. श्री अनिलजी परब व जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करूनही मंजुरी मिळाली नाही. अतिवृष्टीमध्ये अतीतातडीच्या कामामध्ये अधिकाऱ्यांनी समावेश केला नसल्यामुळे हे महत्वाचे साकव प्रलंबित राहिले आहेत. ही बाब रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. अनिल परब यांची आज पुन्हा भेट घेऊन वाहून गेलेल्या साकवांची वस्तूस्थिती निदर्शनास आणून दिली. याची पालकमंत्री महोदयांनी तातडीने दखल घेऊन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी आमदार श्री वैभव नाईक उपस्थित होते.*

Comments