समाजातील सर्व घटकांना काँगेसच न्याय देवू शकते
समाजातील सर्व घटकांना काँगेसच न्याय देवू शकते !
ओबीसी मोर्चाच्या पार्श्वभुमीवर अशोकराव जाधवांचे वक्तव्य !
देवरुख -शुक्रवार दिनांक १८ फेब्रुवारी रोजी नाना पटोले अध्यक्ष महा प्रदेश काँग्रेस , मा ना विजयजी वडट्टीवार मंत्री पुनर्वसन व मदत आणि मा ना सुनिल जी केदार तसेच भानुदास माळी अध्यक्ष महा प्रदेश ओबीसी विभाग , अॅड गुलाबराव घोरपडे प्रभारी रत्नागिरी जिल्हा , अविनाश लाड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष यांचे नेतृत्वा खाली ओबीसी समाजाच्या न्याय मागणी साठी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या साठी चिपळूण ,संगमेश्वर , लांजा , रत्नागिरी मध्ये मोर्चाच्या पार्श्वभुमीवर जनतेशी संवाद साधताना काँग्रेसच सर्व समाजातील घटकांना न्याय देवू शकते असे प्रतिपादन अशोकराव जाधव यांनी केले .
या बाबत आज दिनांक 15 रोजी देवरूख येथे संगमेश्वर तालुका काँग्रेसची बैठक तालुका अध्यक्ष दत्ताजी परकार यांचे अध्यक्षतेखाली आणि अशोकराव जाधव जेष्ठ काँग्रेसचे नेते यांचे ऊपस्थितीत देवरुख शहर काँगेसचे अध्यक्ष अनिलजी भुवड यांचे निवासस्थाना बाहेरील सभा मंडपात बैठक पार पडली तेव्हा शुक्रवार दिनांक १८ रोजी रत्नागिरी येथे ओबीसी च्या न्याय हक्का साठी आणि भाजपाचे केंद्र सरकार ओबीसी वर जो अन्याय करीत आहे त्या विरोधात नाना भाऊ पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी यांचे नेतृत्वात आणि मंत्री विजय वडट्टीवार पुनर्वसन मंत्री , मंत्री सुनिल केदार दुग्ध, पशुपालन मंत्री , भानुदास माळी अध्यक्ष महा प्रदेश काँग्रेस ओबीसी विभाग , अॅड गुलाबराव घोरपडे प्रभारी रत्नागिरी जिल्हा , अविनाश लाड अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा काँग्रेस , माजी आमदार हुस्नबानू खलफे, अशोकराव जाधव जेष्ठ काँग्रेस नेते आणि उपाध्यक्ष, प्रवक्ते , दिपक राऊत महा प्रदेश ओबीसी ऊपाध्यक्ष , दिपक निवाते अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा ओबीसी विभाग तसेच सर्व तालुका अध्यक्ष , सर्व सेलचे प्रमुख अध्यक्ष पदाधिकारी यांचे नेतृत्वा खाली मोर्चा निघणार आहे . मोर्चा काँग्रेस भुवन रत्नागिरी येथून साडे आकरला निघेल त्या पुर्वी साडे दहाला काँग्रेस भुवन मध्ये नाना भाऊ पटोले , मंत्री विजय वडट्टीवार हे रत्नागिरी जिल्हातील पुनर्वसन प्रश्नाबाबत चर्चा करतील आणि मंत्री सुनिल केदार हे रत्नागिरी जिल्हातील दुध ऊत्पादकांच्या समस्यांचे निराकण करतील त्यानंतर नाना भाऊ पटोले ओबीसी बाबत काँग्रेसची भुमिका आणि पुढील वाटचाली बाबत मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे सर्वांनी मोर्चा साठी दहा वाजता काँग्रेस भुवनच्या जवळ जमायचे आहे याची सर्व जिल्हातील कार्यकर्ता नी नोंद घ्यायची आहे . असे अविनाश लाड अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा काँग्रेस यांचे वतीने सुचित करण्यात आले आहे . या सर्व कार्यक्रमाचे नियोजन लाड जिल्हा अध्यक्ष हे स्वःहा जिल्हाभर करत आहेत त्यचाच एक भाग म्हणून आज संगमेश्वर तालुका काँग्रेसची बैठक झाली बैठकीत दत्ताजी परकार तालुका अध्यक्ष , संदिप वेल्हाळ सरचिाणीस , दिलीप बोथले माजी जिल्हा परिषद सदस्य ,अनंत धामणे , ऊत्तम गायकवाड , अनिल भुवड , पिलणकर , शेटये इत्यादी प्रमुख लोक ऊपस्थित होते .
Comments
Post a Comment