रत्नागिरी:मच्छी ट्रकला अपघात

रत्नागिरीवरून नाटे येथे मच्छी आणण्यासाठी निघालेल्या ट्रकला अपघात होऊन तो बाजूला असलेल्या विहिरीत
कोसळता कोसळता बचावल्याची घटना घडली. या अपघातात ट्रकचालक किरकोळ जखमी झाला आहे.या अपघात प्रकरणी नाटे पोलिसांत नोंद झाली नव्हती.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार एम. एच. ०८/ एपी ३०९३ हा मच्छीवाहू ट्रक रत्नागिरी येथून नाटे येथे मच्छी आणण्यासाठी चालला होता. त्या ट्रकमध्ये बर्फ भरलेला होता. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास तो ट्रक कशेळी कोंबे येथे आला असता अचानक चालकाचा ताबा सुटला आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीच्या तोंडाजवळ जावून कलंडला. सुदैवाने तो विहिरीत पडता पडता बचावला.
मात्र, झालेल्या अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. याप्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
(Image used for reference purposes only)

Comments