महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी तर्फे मराठी राजभाषा दिन निमित्ताने पावनखिंड या चित्रपटाचा रत्नागिरीकरांसाठी मोफत शो चे आयोजन; मनसे सरचिटणीस डॉ. मनोज भाऊ चव्हाण यांचा उपक्रम
महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन हा एखाद्या उत्सवा सारखाच साजरा केला जातो. रत्नागिरी मध्ये रंगारंग ग्रंथदिंडी पारंपरिक वेशभूषा वाळूशिल्प या सारख्या नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. राज ठाकरेंच्या आदेशानुसार या वर्षी पक्षाचे सरचिटणीस व कामगार सेना अध्यक्ष मनोज भाऊ चव्हाण यांच्या प्रयत्नाने तसेच रत्नागिरी जिल्हा संपर्कअध्यक्ष सतीशजी नारकर व जिल्हाध्यक्ष जितेंद्रचव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली रत्नागिरी मध्ये रविवारी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता नरवीर बाजीप्रभु देशपांडे यांच्या स्वराज्य प्रेमावर धारातीर्थी जाणे या प्रसंगावरील पावनखिंड या मराठीतील बहुप्रतिक्षित व बहुचर्चित चित्रपटाचा मोफत शो चे आयोजन करण्यात आले आहे.
कोव्हिड निर्बंधांमुळे फक्त निमंत्रितांसाठीच हा शो आयोजित केला गेला आहे. शहरातील महिला, महाविद्यालयीन तरुण तरुणी, जेष्ठ नागरीक काही समाजसेवी संस्थाचे कार्यकर्ते इत्यादींना निमंत्रित म्हणून पास देउन हा शो लावला जाणार आहे असे आयोजकांनी कळवले आहे.
या शो चे संपूर्ण नियोजन श्री अरविंद मालाडकर,श्री बिपीन शिंदे श्री छोटू खामकर,श्री रुपेश जाधव,शैलेश मुकादम तसेच मनसे चे उपजिल्हाअध्यक्ष रुपेश सावंत,शहर पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत.
टिप:-करोमा मर्यादे मुळे फक्त निमंत्रित पास धारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच करोना निर्बंधाचे पालन करूनच हा कार्यक्रम पार पडणार आहे.
Comments
Post a Comment