रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे आयोजन
रत्नागिरी- जि.प माध्यमिक शिक्षण विभाग, रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येत आहे. विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षा प्राथमिक गट - पाचवी ते सातवी, माध्यमिक गट - आठवी ते दहावी या दोन गटात घेण्यात येणार असून मराठी, इंग्रजी, उर्दू या भाषेत परीक्षा देता येणार आहे. दोन्ही गटासाठी विज्ञान रंजन स्पर्धा परीक्षेची फी (प्रती विद्यार्थी) ४० रुपये असून २५ फेब्रुवारी २०२२ पर्यत जिल्ह्यातील शाळांनी नावनोंदणी करावी असे जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी प्रत्येक तालुक्यातील तालुकाध्यक्षांशी तसेच जिल्हाध्यक्ष रवींद्र इनामदार- 9422382084, कार्यवाह प्रभाकर सनगरे- 9423050029 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment