भारताचे "येवढे" जवान शहीद
अरुणाचल प्रदेशातील कामेंग सेक्टरमध्ये उंच भागातील क्षेत्रात रविवारी हिमस्खलनाची दुर्घटना घडली. यामध्ये भारतीय लष्कराचे 7 जवान अडकल्याची माहिती देण्यात आली होती. लष्कराने बचावकार्य सुरू केले होते. परंतु आता या 7 ही जवानांचे मृतदेह हाती लागले आहेत. त्यांचे मृतदेह हिमस्खलनाच्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत. भारतीय लष्कराने याची माहिती दिली आहे.
Comments
Post a Comment