मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी केंद्र सरकारकडे रत्नागिरी जिल्ह्यातून २५ हजार पत्रे पोस्टाने पाठवुयात: मंत्री ना.उदय सामंत

मी राज्यमंत्री असताना मराठी भाषेचे देखील खाते माझ्याकडे होते. नगरविकास खातेही माझ्याकडे होते. मराठी भाषेच्या अंतर्गत 5 महामंडळे येतात. देशाच्या पातळीवर मराठी भाषा किती जुनी भाषा आहे हे या माध्यमातून सांगता येत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास प्राथमिक शाळा सुधारल्या जातिल, संशोधनासाठि केंद्राकडून निधी मिळू शकेल. अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरेंनी पंतप्रधानांची भेट घेतली. सध्या मातृ भाषे बद्दल काय करणार आहोत हे सांगण्याची वेळ आलेली आहे. राज्यातील स्थानिक बोली भाषांवर संशोधन झाले पाहिजे. प्राथमिक शिक्षकांनाही मी विनंती करतो की राज्यातील थोर व्यक्ती विद्यार्थ्यांना माहीती असल्या पाहिजेत. त्यांचे कार्य विद्यार्थ्यांना कळले पाहिजेत. यासाठी शिक्षकांनी विशेष परिश्रम घ्यावेत. महाविकास आघाडी सरकारने 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिवस म्हणून प्रत्येक कॉलेज मध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार म्हणून आम्ही काम करत असताना जनतेनेही सहभाग घ्यावा. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी 25 हजार पत्रे जिल्ह्यातून पाठवुयात. असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांनी मालगूंड येथे व्यक्त केले. 
रत्नागिरी तालुक्यातील मालगूंड येथील कवी केशवसूत स्मारक येथे शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा-मालगूंड, कवी केशवसूत स्मारक मालगूंड आयोजीत मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदय सामंत व्यासपिठावरुन प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमावेळी खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, पंचायत समिती सदस्य गजानन पाटील, सभापती संजना माने, उप सभापती ऊत्तम सावंत, रमेश किर, दिलीप सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, अरुण नेरुरकर, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती साधना साळवी, कोमसाप कोषाध्यक्ष तथा विश्वस्त प्रकाश दळवी, दिपक दुर्गवळी, पंचायत समिती सदस्य उत्तम मोरे, मेघना पाष्टे, कोमसाप जिल्हाध्यक्ष डॉ.शशांक पाटील, गट शिक्षणाधिकारी सुनिल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणात मागिल सहा वर्षे मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम साजरा होतोय. मराठी भाषा लोप पावत चालताहेत का हा प्रश्न माझ्या मनात निर्माण होतोय. राज्य शासनाने मराठी भाषा भवन उभारण्याचा निर्णय घेतलाय. मराठी भाषा जपण्यासाठी पालकांचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. शहरात मराठी शाळा चालवताना खूप त्रास संस्था चालकांना तसेच शासनाला सहन करावा लागतो. खूप परिश्रम घ्यावे लागत आहेत. मराठी भाषेची चळवळ ग्रामिण भागात महत्त्वाची आहे. असे मत व्यक्त केले.

Comments