रत्नागिरी:नुकसान करणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल
संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथे पत्रा शेडचे नुकसान करून पलायन करणाऱ्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रविवार दिनांक
२० फेब्रुवारी रोजी संगमेश्वर पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे. संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद पोलीस हेडकॉन्स्टेबल
प्रशांत शिंदे यांनी दिली आहे. रोशनलाल पूर्बिया(रा. तासोला, राजस्थान) असे आरोपीचे नाव आहे.
रोशनलाल हा आपल्या ताब्यातील ट्रक क्रमांक (आरजे १४, जीसी ९२५५) घेऊन मुंबई-गोवा महामार्गावरुन जात होता. मानसकोंड येथे रिव्हर्स घेताना ट्रकची पंक्चर
काढण्याच्या पत्रा शेडला धडक बसली. यामध्ये शेडचे नुकसान झाले आहे. यानंतर रोशनलाल हा ट्रक घेऊन पलायन करत होता. त्याला संगमेश्वर येथे पकडण्यात
आले. या प्रकरणी रोशनलाल याच्यावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रशांत शिंदे
करीत आहेत.
Comments
Post a Comment