रत्नागिरी:गायीला धडक देणाऱ्या दुचाकी स्वाराविरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी:
बेकायदेशिपणे दुचाकी चालवून गाईला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना जाकादेवी ते चाफे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. शांताराम सखाराम काताळे (४०, रा. चाफे काताळेवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-०८ एडब्ल्यू-८४५५) वरुन जाकादेवी ते चाफे असा जात होता. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या गाईला त्यांनी धडक देत अपघात केला. यात शांताराम काताळे यांना दुखापत झाली असून, अधिक तपास पोलिस हवालदार राजवैद्य करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा