छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या दयनीय अवस्थे बाबत

🔴🔴 *आम आदमी पार्टी रत्नागिरी ने UNESCO ला छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या दयनीय अवस्थे बाबत केले अवगत*

आम आदमी पार्टी रत्नागिरीचे अंतरिम संयोजक श्री ज्योतिप्रभा पाटील यांनी माननीय केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, श्री जी कृष्णा रेड्डी आणि माननीय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या सचिवांसह, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे महासंचालक आणि UNESCO च्या संचालकांना निवेदने पाठवली आहेत आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग व युनेस्कोला, रत्नागिरीच्या स्थानिक प्रशासनाला आणि संबंधित विभागांना, मुघलांच्या ताब्यात जाण्यापूर्वी छत्रपती संभाजी महाराज ज्या मंदिरांजवळ होते, त्या मंदिरांची डागडुजी करण्यासाठी आणि या स्मारकांसाठी एक संकुल बांधण्याबाबत दिशानिर्देश जारी करण्याची मागणी केली आहे .

प्राचीन मंदिरांच्या सद्यस्थितीबद्दलही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Comments