राजापूर तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न
राजापूर तालुका कॉंग्रेस कमिटीची बैठक सोमवारी सकाळी 11 वाजता कॉंग्रेस कार्यालयात पार पडली. सर्व प्रथम दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदी नाना पटोले यांची निवड झाल्यापासून एक वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. त्याचप्रमाणे कॉंग्रेस च्या ऑनलाईन सभासद नोंदणीबाबत माहीती सांगण्यात आली. तसेच शहरात आणि जिल्हा परिषद गट निहाय बुथ निहाय प्रत्येकी दोन दोन एनरोलर म्हणुन निवड करण्याबाबत माहीती देण्यात आली. प्रत्येक बुथवर १०० जणांची सभासद नोंदणी करण्याचे टार्गेट देण्यात आले. त्याचप्रमाणे १८ फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत कॉंग्रेस ओ.बी.सी.मेळावा आयोजीत करावयाचा असून त्याचे नियोजन करण्यात आले.
सदर बैठकीत माजी विधान परिषद आमदार व प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, तालुकाध्यक्ष सुभाष बाकाळकर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मनोहर सप्रे, माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे, कॉंग्रेसचे शरफुद्दीन काझी, कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष महंमदअली वाघू, साखरी नाटे ग्रामपंचायत सदस्य मलिक गडकरी, मजिद सायेकर, कशेळी ग्रामपंचायत सदस्य अनंत फणसे, युवक कॉंग्रेसचे मंदार सप्रे, कुवेशी ग्रामपंचायतीच्या सरपंच मोनिका कांबळे, मनोहर कांबळे, वैभव कुवेसकर, पाचल उपसरपंच किशोर नारकर, विनायक सक्रे, शिळचे गोपाळ गोंडाळ, आडिवरेचे आडिवरेकर गुरुजी, आदी कायकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment