कारची रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला धडक


रत्नागिरी:
मुंबई-गोवा महामार्गावरील असगणी फाटा, खेड येथे हुंडाई आय-10 ने रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला
ठोकरल्याची घटना काल 6 फेब्रुवारी रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एजाज महालदार(43, मुंब्रा, ठाणे) हे आपल्या ताब्यातील आय-10 घेऊ न चिपळूणकडून मुंबईच्या दिशेने जात होते. ते मुंबई-गोवा महामार्गावरील अगसणी फाटा येथे आले
असता रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला ठोकर दिली.यामध्ये विलास राजाराम आंब्रे (53, रा. आवाशी,ताम्हणवाडी, खेड) हे जखमी झाले. त्यांनी याबाबतची
फिर्याद खेड पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार कार चालक ऐजाज महालदार याच्यावर भादविकलम 279,337,338 मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.


Comments