"आमच्या सरकारमुळे गरीब लक्षाधीश".... असे म्हणाले....

नवी दिल्ली :
‘‘गरिबांना सरकार जी घरे देते त्यामुळे ते लक्षाधीश बनतात. आमच्या सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मागील ७ वर्षांत ३ कोटी लोकांना अशी घरे देऊन लक्षाधीश बनविले आहे.’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.‘आत्मनिर्भर अर्थव्यवस्था’ या विषयावर भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की,‘‘ मागील सात वर्षांत आमच्या निर्णयांमुळे देश फार पुढे गेला आहे. स्वातंत्र्याच्या ‘अमृत’काळात देशासमोर शतकातून एकदाच येणाऱ्या महासाथीचे संकट कोसळले पण देशवासीयांनी हे आव्हान स्वीकारले. ‘कोरोना’नंतरच्या काळात जग सध्यासारखे असणार नाही. मात्र जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे. जग भारताला आता अधिक सशक्त देशाच्या रूपात पाहू इच्छिते. हा काळ नव्या संधींचा तसेच नवीन संकल्पांच्या सिद्धीचा आहे.
 
मोदी म्हणाले
⏺️राष्ट्ररक्षेसाठी सीमावर्ती भागांतील गावांचा वेगाने विकास हवा
⏺️सीमेवरील दुर्गम गावांत सरकार ‘एनसीसी’ शिबिरे भरवेल
⏺️गरीब, मध्यम वर्गाला मूलभूत सुविधा देण्यावर भर
⏺️‘जल जीवन मिशन’वर वेगाने काम सुरू केले आहे
⏺️केन- बेतवासारख्या प्रकल्पामुळे बुंदेलखंडचे चित्र बदलेल



Comments