टीम इंडियाला सामन्यादरम्यान बसला जोरदार झटका; वाचा सविस्तर
IND vs WI T20I 2022:
वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात यजमान भारताने सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवले आणि 6 विकेटने सहज विजय मिळवला. पण रोहित शर्माच्या टीम इंडियापुढे आता नवीन संकट उभे राहिले आहे. या सामन्यादरम्यान टीम इंडियाचे दोन युवा क्रिकेटपटू जखमी झाले. वेस्ट इंडिजच्या डावाच्या 19व्या षटकात, तेज गोलंदाज दीपक चाहरच्या उजव्या हाताला किरोन पोलार्डचा पुल शॉट रोखण्याच्या प्रयत्नात दुखापत झाली. त्यानंतर त्याला मैदानातून पडावे लागले. चाहर गेल्यावर हर्षल पटेलने शेवटचे षटक केले. दरम्यान, चाहर पुढील सामन्यात खेळू शकेल की नाही हे नंतर ठरवले जाईल. तसेच अष्टपैलू व्यंकटेश अय्यरला देखील दुखापत झाली होती. पण अय्यर भारतीय डावात फलंदाजीसाठी आला आणि तो खूपच आरामदायक दिसत होता.
वेंकटेश अय्यरच्या उजव्या हाताला 17व्या षटकात पोलार्डच्या शॉटवर बाउंड्री लाईनवर चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात उजव्या हाताला दुखापत झाली. व्यंकटेश मात्र त्यानंतर फलंदाजीला आला आणि त्याने 13 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या. त्यामुळे आता दोन्ही खेळाडूंचे स्कॅन रिपोर्ट आल्यानंतरच त्यांच्या पुढे मालिकेत खेळण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान चाहर आणि व्यंकटेशच्या दुखापतीमध्ये एक गोष्ट मात्र सारखी राहिली आणि ती म्हणजे स्ट इंडिजचा कर्णधार किरन पोलार्ड. पोलार्डच्या दोन जोरदार फटक्यांमुळे वरील दोन्ही भारतीय खेळाडू जखमी झाले. त्यापैकी एकाला मैदानाबाहेर जावे लागले. या सामन्यात पोलार्डने अवघ्या 24 धावा केल्या. पण या खेळीदरम्यान त्याने असे दोन शॉट्स खेळले, ज्यात चाहर आणि अय्यर त्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना जखमी झाले.
उल्लेखनीय म्हणजे या झटपट क्रिकेटच्या मालिकेपूवी टीम इंडियाचे तीन खेळाडू दुखापतीच्या समस्येमुळे बाहेर पडले आहेत. उपकर्णधार केएल राहुल, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा या यादीत समावेश आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा T20 सामना 18 फेब्रुवार, शुक्रवारी खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून एकीकडे यजमान भारतीय संघ आणखी एक सिरीज आपल्या खिशात घालू इच्छित असेल तर दुसरीकडे, विंडीज संघाला मालिकेत आव्हान कायम ठेवण्यासाठी विजयाची गरज आहे.
Comments
Post a Comment