माजी आमदार हुस्नबानू खलिफेंच्या प्रयत्नांना मोठे यश, चार मोठ्या विकास कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात
राजापूरातील काँग्रेस पक्षाच्या नेत्या, माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांना राजापूर तालुक्यातील रस्ते विकासाची चार मोठी कामे मंजूर करुन आणण्यात यश आले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे राजापूर तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सदर चार मोठ्या कामांच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
राजापूर तालुक्यातील सावडाव शेलारवाडी ते हातदे विचारे वाडी पूल उभारणी करणे, विठापेठ अणूस्कुरा, पाचल, ओणी, साटवली पावस रस्ता विशेष दुरुस्ती करणे, केळवली जवळेथर रस्त्याचे रुंदीकरण करणे, गोठणे दोनिवडे सौंदळ रस्त्याचे रुंदीकरण करणे अशा मोठ्या कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सदरची विकासकामे मंजूर झाल्याबद्दल माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे यांचे तालुकावासियांमधून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment