माजी आमदार हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी केली शिळ धरण स्थळाची अधि-यांसमवेत पाहणी
राजापूरच्या कॉंग्रेस नेत्या व माजी विधान परिषद आमदार हुस्नबानू खलिफे व माजी नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी राजापूरातील शिळ धरण स्थळाची पाहणी केली. जलसंधारण विभागाच्या वतीने शिळ गावात लघू पाटबंधारे योजना मंजूर झाली असून त्या ठिकाणी धरण उभारण्यात येणार आहे. या धरणाच्या मंजुरीसाठी माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी विशेष प्रयत्न केले होते. या धरणाला 20 जानेवारी 2021 रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. या धरणामुळे 375 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शिळ आणि हातणकरवाडी या गावांना या धरणाचा लाभ होणार आहे. या धरणाला चार किलोमीटर आणि तीन किलोमीटर असे दोन कालवे प्रस्तावित आहेत. धरणाचे 37 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली जाणार आहे. धरणात 5466 सहस्त्र घनमीटर एवढा पाणीसाठा होणार आहे. धरणाची लांबी 410 मिटर असेल तर 45.83 मिटर उंची असणार आहे. धरणाला 2 कॅनाॅल होणार आहेत.
या धरणाचे पाणी राजापूर शहराला मिळावे अशी मागणीचा ठराव राजापूर नगर परिषदेत करण्यात आला आहे. नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी ही मागणी उचलून धरली आहे. या पार्श्वभूमीवर राजापूर शहराला कशा पद्धतीने पद्धतीने पाणी देता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
या वेळी जलसंधारण विभागाचे उप विभागीय जलसंधारण अधिकारी एस.आर.पानगले, जलसंधारण अधिकारी सु.प.लाड, देसाई इन्फ्रा प्रोजेक्टचे प्रतिनिधी राजेंद्र देसाई, सुनिल देसाई, प्रोजेक्ट मॅनेजर आर.एस.रघुवंशी, प्रतिनिधी आदित्य पवार आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment