रत्नागिरी:वद्ध महिलेला अज्ञात वाहनाची धडक बसून जागीच मृत्यू
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे एका वद्ध महिलेला अज्ञात वाहनाची धडक बसून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली
आहे. कंटेनरसारख्या अवजड वाहनाचे चाक या महिलेच्या डोक्यावरून गेले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. संगमेश्वर पोलिस अधिक तपास करत
आहेत. अपघातातील मृत महिलेचे नाव विता शिवराम गुरव (६१) असून, ती चिखली- गुरववाडी येथील रहिवासी आहे. तुरळ येथे काही ग्रामस्थ व रिक्षा व्यावसायिकांना एक महिला तिच्या डोक्यावरुन गाडीचे चाक गेल्याने मेंदू बाहेर येऊन मृतावस्थेत दिसली.
रिक्षा व्यावसायिकांनी तत्काळ ही बाब रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या कानावर घातली.चव्हाण यांनी नाकाबंदी करून हे वाहन पकडण्यासाठी महामार्ग वाहतूक विभागाचे सचिन घाग यांच्याशी संपर्क साधला. तुरळचे पोलिस पाटील संजय ओकटे यांनी या घटनेची खबर संगमेश्वर पोलिसांना दिली.
Comments
Post a Comment