रत्नागिरीत महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात कॉंग्रेस भुवन येथे घोषणाबाजी
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी ईडी ने अटक केल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीतील महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्रातील भाजपा सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडी सरकारला भक्कम पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कॉंग्रेस पार्टी व शिवसेना पार्टीच्या रत्नागिरीतील कार्यकर्ते नेते मंडळीनी एकत्र येऊन कॉंग्रेस भुवन येथे केंद्र सरकारचा निषेध केला. या प्रसंगी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस पार्टीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थीत होते. यावेळी राजाभाऊ लिमये, कुमार शेट्ये, बशीर मुर्तुजा, राजन सुर्वे, कपिल नागवेकर, बिपिन बंदरकर, निलेश भोसले, सुस्मिता सुर्वे, सुदेश ओसवाल, बरकत काझी, चेतन नावरांगे, बारक्या हळदणकर, शफाकत काद्री, अनिरुद्ध कांबळे, सुनील विश्वासराव आदी महविकास आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कॉंग्रेस भुवन येथे केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment