दागिने पॉलिशच्या बहाण्याने फिरणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी चोपले

गुहागर तालुक्यातील तळवली येथे काल बुधवारी दुपारी दोन युवक तांबे पितळची भांडी व बांगडया साफ करणारे
असे ओरडत फिरत होते. यावेळी एका महिलेच्या घरी ते गेले असता भांडी व बांगड्या पॉलिश करून देतो असे
सांगून सोन्याच्या काही वस्तू आहेत का विचारू लागले. 

महिलेला त्यांचा संशय आला तिने आमच्याकडे काही नाही सांगून त्याना जाण्यास सांगितले. जाण्यास सांगूनही
दागिन्यांसाठी आग्रह करत होते. शेवटी त्या महिलेने हळूच बाहेर जाऊन येथील लोकांना हा सारा प्रकार सांगितला. त्यानंतर सगळे एकत्र आले. त्यांनी दोघांना पकडले. याबरोबर त्यांची भंबेरी उडाली. त्यांची पूर्ण
माहिती विचारुन घेतले असता ते बिहार येथून चिपळूणला आले व तेथून तळवली येथे आले. सोबत आधारकार्ड सुद्धा बोगस असल्याचे आढळून आले. आता आपली सुटका नाही हे कळताच त्यांनी तिथून पळून
जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ग्रामस्थांनी पाठलाग करून त्यांना पकडले आणि चोप चोप चोपले. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसना याची माहिती दिली. दोघांना पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे.

Comments