राजापूर तालुक्यातील गोवळ ग्रामसभेत रिफायनरी विरोधात ठराव

राजापूर तालुक्यातील गोवळ ग्रामपंचायतीने रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात नुकताच ठराव केला आहे. दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत रिफायनरी प्रकल्प विरोधात ठराव केला. सदर ठरावाची प्रत राजापूर चे तहसीलदार व प्रांताधिकारी यांना सादर करण्यात आला. यापूर्वीच्या ग्रामसभेत रिफायनरी समर्थनार्थ ठराव करण्यात आला होता. यासाठी ग्रामस्थांनी गोवळ गावच्या विकासासाठी काही प्रमुख मागण्या केल्या होत्या. त्या मागण्या मान्य झाल्या तरच रिफायनरी प्रकल्प राबविण्यात यावा अशी भूमिका ग्रामस्थांची होती. रिफायनरी समर्थनार्थ ठराव करण्यात आला होता परंतु आता रिफायनरी प्रकल्प विरोधात ठराव करण्यात आला.

Comments