ट्रकला अपघात ,चालक जागीच ठार, एक जण गंभीर
ट्रक वरील ताबा सुटल्याने झाला अपघात
खेड:
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात कडाप्पा व लादी वाहतूक करणारा मालवाहू ट्रक उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला हा अपघात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडला.
शोएब आतुर खान वय ३२ रा राजस्थान असे त्या ठार झालेल्या चे नाव आहे तर बद्रुद्दीन फारूख वय ३२ हा अन्य चालक गंभीर रित्या जखमी झाला आहे.
ट्रक चालक शोएब खान हा आपल्या ताब्यातील ट्रक क्र आरजे १४जीएच ९५१४ यावर बद्रुद्दीन शेख या अन्य चालकाला घेऊन राजस्थान येथून कडाप्पा हा लादी प्रकार घेऊन गोव्याच्या दिशेने येत होता तो कशेडी घाट उतरत असताना तीव्र उतारात त्याचा ट्रक वरील अचानक ताबा सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या दरडीवर जावून ट्रक आदळला यात शोएब हा चालक जागीच ठार झाला तर बद्रुद्दीन शेख हा चालक चालक केबिनमध्ये अडकून पडत गंभीर जखमी झाला.
या अपघाताचे वृत्त समजताच महामार्गावरील वाहतूक पोलीस उपनिरिक्षक अजित चांदणे, सहाय्यक पोलीस फौजदार बोंडकर, समेल सुर्वे व खेड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल होत मदत कार्य सुरू केले. ट्रक च्या चालक केबिन मध्ये अडकून पडलेल्या शेख व मृत चालक शोएब या दोन्ही चालकांना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले तब्बल तासा भराच्या अथक प्रयत्नां नंतर त्यांना बाहेर काढण्यात आले सकाळच्या सुमारास झालेल्या अपघाताने घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती गंभीर चालकाला केबिन बाहेर काढून कळबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Comments
Post a Comment