रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ओ.पी.डी.विभागात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नाहित
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात ओ.पी.डी. विभागात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहत नसल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गोर गरिब लोकांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयच महत्त्वाचे असते. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक लोक सकाळपासून ओ.पी.डी.साठी नंबर लावण्यासाठी येतात. मात्र डॉक्टरांच्या ठरलेल्या वेळेत डॉक्टर उपस्थित राहत नाहित. अनेक लोक सकाळपासून दुपार पर्यंत डॉक्टरचीच वाट बघत असतात. गुरुवार दिनांक १७ फेब्रुवारी देखील १ नंबर ओ.पी.डी.मध्ये असाच प्रकार घडला. या दिवशी अनेक रुग्णांना डॉक्टरची तासनतास वाट पहावी लागली.
या समस्यांकडे संबंधित वरिष्ठ प्रशासकीय अधिका-यांनी जातिनिशी लक्ष घालून उचित कार्यवाही व्हावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.
Comments
Post a Comment