रत्नागिरी:बैलगाडी स्पर्धेत "याची" बैलगाडी प्रथम
रत्नागिरी:
साडवली येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत कोसुंबमधील समीर बनेंच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. ही भव्यदिव्य स्पर्धा शिवजयंतीनिमित्ताने माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी व शासकीय परवानगी घेऊन युवा कार्यकर्ते प्रद्युम्न माने, साडवली सरपंच राजेश जाधव व संगमेश्वर तालुका बैलगाडी मालक संघटना यांच्या संयोजनाखाली साडवली येथील कै. मीनाताई ठाकरे हायस्कूलच्या पाठीमागील धुळीच्या माळावर या बैलगाडी स्पर्धेचा थरार रंगला या स्पर्धेत ७४ बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली होती.
Comments
Post a Comment