जैतापूर गावात राजापूर पंचायत समितीची मासिक सभा संपन्न
जैतापूर एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित न्यू इंग्लिश स्कूल व श्रीमती स्नेहलता रामचंद्र मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूरच्या गोखले सभागृहात राजापूर पंचायत समितीची मासिक सभा सभापती सौ.करूणा कमलाकर कदम यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत उत्साहात संपन्न झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व राष्ट्रगीताने सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. स्वर्गीय लतादीदी, रमेश देव, शिवसेना नेते स्वर्गीय सुधीर जोशी आदी ज्ञात अज्ञात मान्यवरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर सभापती सौ.कदम यांचा सरपंच सौ.कोंडेकर यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती तेजश्री आवळे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या सौ.निरजा मांजरेकर यांनी केला. संस्था व शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ.राजश्री नारे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सभेला उपस्थित सदस्य व अधिकारी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. सभेला सर्वश्री प्रकाश गुरव, अभिजित तेली, बाजीराव विश्वासराव, प्रतिक मठकर, सुभाष गुरव, सौ.प्रमिला कानडे, सौ.अश्विनी शिवणेकर आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. सचिव, सहाय्यक गटविकास अधिकारी श्रीमती तेजश्री आवळे यांनी मागील इतिवृत्त वाचून विषय पत्रिकेप्रमाणे सभेला सुरुवात केली. विविध खात्याच्या अधिका-यांनी आपापल्या खात्याच्या कामाचा आढावा दिला. सभेला ग्रामपंचायत जैतापूर उपसरपंच सौ.श्रुती मांजरेकर, सौ.अनुजा दांडेकर, ग्रामसेवक, कमलाकर कदम आदी उपस्थित होते. पंचायत राज व्यवस्थेमध्ये शासन प्रशासनाचे कामकाज सभागृहात बसून शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. संस्थेचे विश्वस्त व ग्रामपंचायत सदस्य दिवाकर आडविरकर यांनी सभेचे सुत्रसंचालन केले व सभा घेऊन
शाळेच्या इतिहासात प्रशासकीय कामकाजाची नोंद झाल्याचा आवर्जून उल्लेख केला व राजापूर पंचायत समिती प्रशासनाला धन्यवाद दिले.
Comments
Post a Comment