नारशिंगे येथील स्वयं भू गणेश मंदिरात उद्या माघी गणेश जयंती उत्सव
रत्नागिरी -
तालुक्यातील नारशिंगे येथील शिवकालीन गणेश मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव उद्या दि.०४ रोजी साधेपणाने साजरा होणार आहे.सकाळी ८.०० वाजता अभिषेक विधी, श्रींची पूजा आरती दुपारी १२.०० वा. १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ हळदीकुंकू, सायंकाळी ७.०० वाजता श्रींची आरती असे कार्यक्रम होणार आहेत. परिसरातील भाविकांनी कोविड नियमावलीचे पालन करून श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोडे परिवारा तर्फे करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment