रत्नागिरीतील कोतवडे कुंभारवाडी नळपाणी योजना पाईपलाईन दुरुस्ती कामाचे भूमिपूजन
15 वा वित्तआयोग ग्रामपंचायत स्तर बंधीत निधी सन 2020- 21 अंतर्गत कोतवडे कुंभारवाडी येथील नळपाणी पुरवठा पाईपलाईन दुरुस्ती कामाचा भूमीपूजन समारंभ दिनांक 06 फेब्रुवारी 2022 रोजी ग्रुप ग्रामपंचायत कोतवडेचे सरपंच तुफील पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत सम्पन्न झाला.
सुमारे 1,89,322/- रुपये अंदाजपत्रकिय रकमेच्या या कामांचा शुभारंभ स्थानिक ग्रामस्थ प्रकाश कोतवडेकर, रमाकांत कोळंबेकर, रामचंद्र कोळंबेकर, शंकर कोळंबेकर आणि सरपंच तुफील पटेल यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत कोतवडेचे सरपंच तुफील पटेल, माजी उपसरपंच स्वप्नील मयेकर, प्रकाश कोतवडेकर, अशोक फणसोपकर, संजय साळवी, रामचंद्र कोळंबेकर, रमाकांत कोळंबेकर, गजानन साळवी, राजेंद्र फणसोपकर, शंकर कोळंबेकर, स्वप्नील कोळंबेकर, अनंत फणसोपकर, निखिल मालगुंडकर, काशिनाथ कोतवडेकर, निनाद फणसोपकर आदी उपस्थित होते.
प्रारंभ झालेले काम शिमगोत्सव पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन ग्रुप ग्रामपंचायत कोतवडेच्या वतीने यावेळी देण्यात आले.
Comments
Post a Comment