राजापूर धारतळे येथील विश्रांती गृहाचे उद्घाटन, राजापूर येथील कुणबी समाज सेवा मंडळ मुंबई रजि ने केले मोठे अर्थसहाय्य

राजापूर येथील कुणबी समाज सेवा मंडळ मुंबई रजि (आडिवरे, कशेळी, गावखडी ) च्या वतीने दिनांक ६ फेब्रुवारी २०२२ रोजी धारतळे आरोग्य केंद्र परिसरातील  समाज बांधव यांची कोविड काळात, पावसाळ्यात उन्हाळ्यात गर्दीच्या वेळी आरोग्य चिकित्सा करण्यासाठी आलेल्या सर्वांची खुप मोठी गैरसोय होत होती. त्यासाठी मंडळाने आरोग्य केंद्राच्या शेजारी '' विश्रांती गृह '' बांधण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात विश्रांती गृहच्या प्रवेशद्वार जवळ प्रमुख उद्घाटक ओ.बी.सी. जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करुन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर नाम फलकाचे अनावरण ओ. बी. सी. जनमोर्चा / कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे सरचिटणीस अरविंद डाफळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई चे सहसचिव भास्कर चव्हाण, कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका राजापूरचे अध्यक्ष शिवाजीराव तेरवणकर, सचिव अनिल भोवड, ग्रामीण शाखा सचिव सौ. मानसी दिवटे, कुणबी समाज सेवा मंडळ मुंबई रजिचे अध्यक्ष प्रभाकर वारीक, ग्रामीण समितीचे उपाध्यक्ष विजय बंडबे, रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष, प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे, जिल्हा परिषद सदस्य, माजी अर्थ शिक्षण सभापती दिपक नागले, डॉ. निखिल परांजपे, डॉ. दिपा गोखले, कुणबी पतपेढी राजापूरचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, रविंद्र नागरेकर, कुणबी समाज सेवा मंडळ मुंबई रजिचे उपाध्यक्ष रविकांत थारळी, सुभाष गोराठे प्रमुख कार्यवाह प्रदिप शृंगारे,  सहकार्यवाह कु. गणेश शृंगारे, खजिनदार संजय वारीक अध्यक्ष शंकर वारीक आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात पुढे या विश्रांती गृहाला सढळहस्ते विभागातील गाव वाडी मंडळे आणि वैयक्तिक देणगी देणार्‍या समाज बांधवांचे शाब्दिक आभार मानले. पुढे आरोग्य अधिकारी डॉक्टर निखिल परांजपे यांचा निस्वार्थी सेवेबद्दल शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

Comments