रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १४/१५ च्या नगरसेविका सौ.दया चवंडे व आप्पे चवंडे यांच्या प्रयत्नांना यश; जयस्तंभ ते गिरोबाचौक तळ्यापर्यंत (खारेघाटरोड) येथील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण पूर्ण
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते गिरोबाचौक तळ्यापर्यंत (खारेघाटरोड) येथील रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण पूर्ण झाले. यासाठी स्थानिक नगरसेविका सौ. दया चवंडे व आप्पे चवंडे शहर प्रमुख बिपीन बंदरकर, राहुल रसाळ, नारसेवक सोहेल मुकादम यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करून रस्त्यामधील लाईटचे पोल व रस्ता रुंदीकरण करून डांबरीकरण करुन घेतले. त्यामुळे राजीवडा ते मांडवी व तेलीआळी यामधील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. त्यामुळे आता या मार्गावरील नागरीकांचा येण्या-जाण्यास प्रवास सुखकर झाल्यामुळे नागरीकांतर्फे आभार मानले जात आहेत.
Comments
Post a Comment