"आबलोली भूषण"पूरस्काराने आप्पा कदम सन्मानीत
आप्पांच्या ८८व्या रक्तदानाने आबलोली गावाचा नावलौकीक वाढला -- चंद्रकांतशेठ बाईत
"आबलोली भूषण"पूरस्काराने आप्पा कदम सन्मानीत
ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी, श्रीमती नम्रता कारेकर यांचाही सत्कार कोरोनाचे सर्व नियम पाळून संपन्न
-------------------------------------------
आबलोली - प्रतिनीधी
आबलोली गावचे तंटामूक्ती कमीटीचे सलग ११वर्ष अविरोध अध्यक्षपद भूषवून गावात सामाजिक सलोखा राखणारे आणि ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात निस्वार्थीपणे समाजसेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे ते माझ्या जिवलग मित्राचे, माझे मार्गदर्शक दिवंगत राजाभाऊ कदम यांचे जेष्ठ चिरंजिव विद्याधर राजाराम कदम उर्फ आप्पा कदम यांनी अनेक जीव वाचविण्यासाठी आजपर्यंत ८८ व्या वेळा रक्तदान केले याची दखल गुहागरच्या प्रेस क्लबने घेऊन पत्रकार दिनी आप्पांना "जिवनदाता" पूरस्काराने सन्मानीत केलेल्या आप्पा कदम यांना निर्मल ग्रामपंचायत आबलोली , आप्पा कदम प्रेमी मित्र मंडळाने आयोजीत केलेल्या भव्यदिव्य कार्यक्रमात"जिवनदाता "आप्पा कदम यांना "आबलोली भूषण "पूरस्काराने सन्मानीत करून आबलोली गावाचा नाव लौकिक वाढवीला आहे असे स्पष्ट मत शिक्षण महर्षी , उद्योजक चंद्रकांतशेठ बाईत तथा आबाशेठ बाईत यांनी व्यक्त केले.
गुहागर तालुक्यातील सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्रात निर्मल ग्रामपंचायत आबलोली,आप्पा कदम प्रेमी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदवन बुध्द विहार आबलोली येथे दि.२४जानेवारी २०२२ रोजी नेत्रतपासणी शिबीर, तर गारवा कृषी पर्यटन केंद्रात दि.२९ जानेवारी २०२२ रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते या रक्तदान शिबीरात जिवनदाता आप्पा कदम या़ंनी ८७ वेळा केलेल्या रक्तदानाचा आदर्श देऊन रक्तदात्यांनी सुद्धा ८७ वेळा रक्तदान करून जिवनदाता आप्पा कदम यांना ६३ व्या जन्मदिनाची अलौकिक भेट दिली ८७ रक्तदाते आणि आप्पा कदम यांचे रक्तदान असे ८८वेळा रक्तदान करण्यात आले सामाजिक बांधीलकीचा वसा जपणा-या जिवनदाता आप्पा कदम यांना "आबलोली भूषण " पूरस्काराने शिक्षण महर्षी ,उद्योजक चंद्रकांतशेठ बाईत तथा आबाशेठ बाईत यांचेहस्ते मान्यवरांचे उपस्थीतीत सन्मानीत करण्यात आले त्यानंतर ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी, अंगणवाडीच्या मदतनीस श्रीमती नम्रता कारेकर यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला नंतर जिवनदाता आप्पा कदम यांचा ६३ वा जन्मदिन केक कापून साजरा करण्यात आला हा संपूर्ण कार्यक्रम कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाला.
यावेळी प्रमूख अतिथी चंद्रकांतशेठ बाईत तथा आबाशेठ बाईत मनोगत व्यक्त करताना पुढे म्हणाले की, कदम कुटुंबाचे आणि बाईत कुटुंबाचे घरोब्याचे संबंध असून आप्पांनी आपल्या आजोबा आणि आई-वडिलांकडून रक्तदाना सारखा समाजसेवेचा वसा अविरत चालू ठेवावा आप्पांचा १०० वेळा रक्तदान करण्याचा संकल्प पूर्ण होवो आणि शतकमहोत्सवही आबलोली ग्रामपंचायत आणि आप्पा कदमप्रेमी मित्र मंडळाने जल्लोषात साजरा करुया आप्पांना निरोगी आयुष्य लाभूदे त्यांच्या कुटुंबाची भरभराट होऊदे आणि आप्पांच्या निस्वार्थीयकार्यात त्यांना सावली सारखी साथ देणा-या त्यांच्या पत्नी आमच्या सूनबाईला शुभेच्या देतो ग्रामपंचायत आबलोली,आप्पा कदम मित्र मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक करतो अशा शुभेच्छा चंद्रकांतशेठ बाईत तथा आबाशेठ बाईत यांनी दिल्या
यावेळी ८८ वेळा रक्तदान करणारे आबलोली भूषण पूरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले जिवनदाता आप्पा कदम मनोगत व्यक्त करताना म्हणाले , माझे वडिल दादा कदम हे कॉन्ट्रक्टर रत्यांची कामे करणारे आणिमी रस्त्यांच्या कामात त्यांना मदत करायचो मी दगड फोडायचो सर्वांचा हाच समज झाला होता की,दगड फोडणारा आपल्या जिवनात पुढे काय ? करणार पण मी ८८ वेळा रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचले या सारखे माझ्या जिवणात दुसरे पुण्य काय असू शकते माझी ,पत्नी,माझे कुटुंब आणि सर्व समाज मला समाज सेवेसाठी ,रक्तदानासाठी प्रोत्साहित करतात माझ्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रेस क्लब गुहागर या पत्रकारांच्या संघटनेचे पत्रकार दिनी "जिवनदाता "पूरस्कार देऊन मला सन्मानीत केलेत आणि आज "आबलोली भूषण " पूरस्कार देऊन सन्मानीत केलेत या आपल्या विश्वासाला माझ्या कडून,माझ्या कुटुंबा कडून कुठच्याही प्रकारचा तडा जाणार नाही असा विश्वास जिवनदाता आप्पा कदम यांनी व्यक्त करुन १००वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी विजय वैद्य यांनी आबाशेठ बाईत यांच्या नावाची अध्यक्ष म्हणून सुचना आणली त्या सूचनेला अविनाश कदम यांनी अनूमोदन दिले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलीत करुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी माद्यमिक विद्यालय आबलोलीचे कलाशिक्षक स्वरूप केळस्कर यांनी मधुर स्वरात गीते सादर करून या कार्यक्रमात जान आणली त्यानंतर आबलोली भूषण पुरस्काराच्या स्मरणीकेचे अमोल होवाळे यांनी वाचन केले त्यानंतर ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी, बौद्धजन सहकारी संघाचे मारूती मोहीते,सुहास गायकवाड , महेंद्र रेडेकर ,भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सचिनशेठ बाईत, प्रमोद गोणबरे,रिपब्लीकन पक्षाचे तालुकाध्यक्ष संदिप कदम , करजकर, अविनाश कदम ,विजय वैद्य, उल्हास काळे, सचिन कारेकर, पोलीस पाटिल महेश भाटकर, ग्रामसंवाद सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमेय आर्यमाने, प्रेस क्लब गुहागरचे सचिव सुरेश आंबेकर, महेश दिंडे,दत्ताराम कदम, तुकाराम निवाते, श्रावणी पागडे, सभापती सौ.पूर्वीताई निमूणकर, आदींनी मनोगतातून आप्पा कदम यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी व्यासपिठावर सत्कार मूर्ती आप्पा कदम , शिक्षण महर्षी ,उद्योजक आबाशेठ बाईत, सभापती सौ.पूर्वीताई निमूणकर, शिवसेनेचे तालुका प्रमूख सचिनशेठ बाईत, भाजपाचे तालुकाध्यक् निलेश सुर्वे, रिपाईचे तालुकाध्यक्ष संदिप कदम ,सरपंच तुकाराम पागडे, ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी, तलाठी राठोड ,पोलीस पाटिल महेश भाटकर,प्रेस क्लब गुहागरचे तालुकाध्यक्ष दिनेश चव्हाण, सचिव सुरेश आंबेकर, प्रमेय आर्यमाने, विजय वैद्य, महेंद्र कदम, उल्हास काळे , सचिन कारेकर, अविनाश कदम , आदी.मान्यवर उपस्थीत होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक रेपाळ यांनी केले.
Comments
Post a Comment