जुगारी गुन्हा दाखल, पोलिसांकडून 9029 रुपयांचा मुद्देमाल जप्त!

रत्नागिरी:-
रत्नागिरी शहरात गैरप्रकारांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत शहर आता सतर्क झाल्याचे चित्र आहे. चालय ते साळवीस्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर जुगार चालवणाऱ्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश बावदाने (वय 44, रा. चर्मालय, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
मंगेश बावदाने हा लोकांकडून जुगार चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून 9 हजार 29 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Comments