आंगणेवाडी भराडी देवीच्या 24 फेब्रुवारीला;'हे' आहेत यंदा नियम

मागील दोन वर्ष कोरोना संकटामुळे कोणताच धार्मिक सण मोठ्या उत्साहात साजरा झालेला नाही. पण आता कोविड 19 चं संकट आटोक्यात आल्याची चिन्हं असल्याने काही प्रमाणात निर्बध हटवण्यास सुरूवात झाली आहे. याला यंदा आंगणेवाडीची भराडी देवी जत्रादेखील अपवाद नाही. मागील 2 वर्ष भाविकांशिवाय पार पडलेल्या या जत्रेमध्ये यंदा भाविकांची उपस्थिती बघायला मिळणार आहे. तळकोकणातील महत्त्वाच्या असलेल्या आंगणेवाडी भराडी देवी जत्रेला अनेक चाकरमनी हमखास हजेरी लावतात. त्यासाठी रेल्वे कडूनही खास सोय करण्यात आली आहे. कोकण रेल्वेने भराडी देवी जत्रेसाठी विशेष रेल्वे सेवा देखील चालवण्यास सुरूवात केली आहे. मग यंदा तुम्ही देखील या जत्रेमध्ये सहभागी होणार असाल तर जाणून घ्या प्रशासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर घातलेले निर्बंध काय असतील?

भराडी देवी यात्रा 2022 नियमावली काय?
⏺️भराडी देवीच्या यात्रेसाठी येणार्‍या भाविकाने कोविड 19 लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणं आवश्यक आहे. लस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळेल.
यात्रेदरम्यान दुकानं थाटणार्‍या व्यापार्‍यांचेही लसीकरण पूर्ण झालेले असवं.
⏺️स्टॉलची संख्या मर्यादित असावी.
⏺️भाविकांमध्ये, व्यापार्‍यांमध्ये सोशल डिस्टंसिंग असणं आवश्यक आहे.
⏺️व्यापार्‍यांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे 100% पालन करावं.
⏺️भाविकांना सुलभ दर्शनाची सोय असावी.

मागील दोन वर्ष भाविक आणि देवी यांची ताटातूट झाल्याने यंदा अनेकजण दर्शनाला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंदाजे 4-5 लाख भाविक दर्शनाला येतील असा अंदाज आहे. एसटी बस संपाचा भाविकांना फटका बसू नये म्हणून देखील विशेष खबरदारी घेतली जात आहे.

Comments